श्रद्धांजली
श्रद्धांजली
दीप अचानक विझला
अंधार खूप झाला..
उजेडातील आठवणी
मनात परत आठवल्या..
काहूर आठवणीचे
आहे तो फ्लॅशबॅक..
दैवाधीन म्हणें जीवन
नकळत मोठा आघात..
असणे अन नसणे
जाणवते ते आज..
मित्र दूर तो गेला
खूप आहे ते अंतर..
जायचेच जरी तेथे
हे जरी अंतिम सत्य..
जीवन जगताना
आम्हा सर्वा तो विसर..
श्रद्धांजली मित्रास
देण्याची वेळ नको रे..
आली तिचं आज
दुर्दैवाचा फटका रे ..
आठवणीची दीपमाळ
प्रत्येकाची वेगळी..
सतत तेवत ठेवा
हीच खरी श्रद्धांजली..
