आजीवन शिक्षण सुरु
आजीवन शिक्षण सुरु
सर्वपल्ली राधाकृष्णनजींचा
पाच सप्टेंबर हा जन्म दिन..
शिक्षक दिन तो आज साजरा
सर्वं गुरुंच्यापायी आमुचे वंदन..
आई आमुची खरी गुरु ती
जीवनी सर्वात होती प्रथम..
अ आ ई बाराखडी गिरवली
प्रसंगी पाठीत धपाटे छान..
शाळेत सारे पूज्य गुरुजी
आणि कॉलेजातील सर..
श्रेष्ठ एका पेक्षा ते एक होते
शिकवीण्यात रस ते सरस..
संस्कार शाळेचे रुजे मनावर
कोरले गेले तेथे असताना..
मातीला तो आकार देऊनी
गुरूंनी घडविले आम्हा सर्वांना ..
"मीच माझा भाग्यविधाता"
शाळेचं हे प्रेरक घोषवाक्य..
सार्थकता त्याची मला पटली
पदोपदी जगतांना हे जीवन..
वडिलांनी दिधला गुरुमंत्र तो
सर्वा व्यावहारिक ज्ञानाचा..
आमुचे तेच ते पहिले हिरो
प्रयत्न अनुकरण करण्याचा..
सभोंवतालचा निसर्ग ही,
गुरु सर्वात तो आहे मोठा..
ज्ञानाचा अमुल्य खजिना,
विखुरला त्याने दाहीदिशांना..
निसर्गापासूनही काही आम्ही,
शिकलो कळतं अन नकळत..
लागता उन्हाचे पायी चटके,
सावलीचा लागलीच तो शोध..
सृष्टीची ही बिन भिंतीची
सर्वात मोठी सुंदर शाळा..
नाही तिथं शिक्षण शुल्क
वाटेल ते सर्वं जीवनी शिका..
गुरु अनेक असून जगती ,
एकलव्यासारखेही शिष्य..
अंगठा ही गुरुदक्षिणा मागे,
गुरु इथे काही कसे कठोर?..
जीवनी, अनुभव अन ठेच,
असतात हेही अप्रत्यक्ष गुरु..
शिकलो काही नाही यापासून ,
तर पहिले पाढे पुन्हा ते सुरु..
प्रिय मित्रानीही शिकवल्या,
न येणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी..
मित्र हे नातं वेगळे आहे मात्र,
सर्वापेक्षा जवळ वाटते भारी..
ज्ञानी प्रिय अनेक मित्र गुरु,
जरी गुरुस्थानी मनात वाटे..
मित्रच ते खरे आहे आमुचे,
प्रेमळ तयांचे निर्मळ ते नाते..
लग्नानंतर जोडीदारही होतो,
गुरु स्थानी तो विराजमान..
व्हा त्वरित एकमेकांचे शिष्य,
होतो सुखाचा सारा संसार..
गुगल सर्च आजचा तो ही
गुरूंमधील आहे तो महागुरू..
ईश्वर काय? त्यासही न कळे
मानवा सांगती ते श्री सद्गुरू..
अज्ञाताचे ज्ञान देण्या धरेवर
ईश्वराने धाडीले विभिन्न गुरु..
शिरसाष्टांग नमस्कार तयांना
*आजीवन शिक्षण सुरु !!*
*आजीवन शिक्षण सुरु !!*
