चंद्र आहे साक्षीला!!
चंद्र आहे साक्षीला!!
चंद्रमा अप्रतिम सुंदर
जेव्हा असतो तो दूर..
त्यावर खोलखोल खड्डे
आहे मात्र ते प्रत्यक्षात..
लोभस अन शीतल
समजून सुधाकरास..
जन्मली संगीतमय
अप्रतिम सुंदर गीत..
बहिणीला वाटे भाऊ
आई साठी चंदा लाल..
प्रियकरा सुंदर प्रेयसी
वाटे चौदहवी का चांद..
रॉकेट लाँचर भीमकाय
अग्रभागी त्या वसे यान..
श्रीहरीकोट्यास १४जुलैस
चंद्रमोहीम सुरु झाली निर्विघ्न..
चांद्रयान ते उंच उडाले
घेण्यास चंद्रमाचा वेध..
अचूक वेळेचा हो मात्र
साधला तो ताळमेळ..
प्रदक्षिणा अनेक वसुधेस
रुंदविल्या यानाच्या कक्षा..
गुरुत्वाकर्षण धरेचे लांघून,
चंद्राकडे वळवली दिशा..
चंद्राचे आहे आकर्षण
खेचले त्याकडे यान..
चंद्रलाही सुरु प्रदक्षिणा
५ ऑगस्टचा होता तो क्षण ..
दीड मासाचा पल्ला
आहे जरी खूप दूर..
धरा निळी दूर दिसें
चंद्र आला तो जवळ..
वरतून खूप खोल सारे
चंद्राचे दिसले खळगे..
उल्का आघाताच्या खुणा
शशीचे खरे रूप कळे..
जसे दिसते तसें नसते
फुटला भ्रमाचा भोपळा..
आठव ओळींची आली
चंद्राचे फोटो बघतांना..
काय सुंदर? काय नाही?
अवघड आहे खरा प्रश्न..
ईश्वर जगी सर्वच सुंदर
सुंदरतेच्या व्याख्या सांपेक्ष..
२३ ऑगस्ट सुदिन आज
सुवर्णयोग झाला चंद्रभेटीचा..
अलगद दक्षिण ध्रुवावरी
लँडर विक्रम तो विसावला..
अभिमानाने उर भरले
भारतीय सर्वजणांचे रे..
सलाम सर्वं संशोधकांना
कार्या त्यांच्या फळ आले..
जरी आधी कधी पडलो
ना सोडली कास प्रयत्नांची..
आज सोनेरी उगवे सुदिन
तिरंग्याची गुढी चंद्रावर उभारली..
दूर धरतीवर संशोधक
सभोंवतीस ना तेथे कोण..
दैदीप्यमान या यशाची हो
चंद्रच देतो साक्ष प्रत्यक्ष ..
