STORYMIRROR

HEMANT NAIK

Classics

4  

HEMANT NAIK

Classics

तडजोड

तडजोड

2 mins
379

स्वर्गात बांधलेल्या गाठी, 

का कधी त्या तुटतात?

अहंम आडवा नित्य येता,

कधीही न त्या जुळतात..


असतें ती छोटी ठिणगी, 

मोबाईल रॉकेल टाकी..

क्षणात होतो तो भडका

सुखी संसार उध्वस्त होतो..


स्वतंत्र त्या अभिव्यक्तीचे 

कौतुक आम्हा  सर्वांना  

बंधन नको कुणा कसले

पारतंत्र्य वाटे ते  आम्हा


संस्कृती कुण्या देशाची

शुद्ध आता ती न राहे..

परकियांचे सहज आक्रमण 

आता जग हे छोटे झाले..


सहन आम्ही का करू हो

आमच्यावरचा हा अन्याय ?

न्याय मिळवण्या जाता,

निष्पाप लेकरावर अन्याय..


कमावणारे सर्वं पति..पत्नी,

न त्यांचे अडून पडते काही..

क्षुल्लक वादात बंधन तुटते, 

तडजोड शब्द आज विसरले..


जीवन असे ही तडजोड,

हे रहस्य ज्यांना समजले ..

समोर कितीही दुःखे आली,

ते सुखी संसारी या रमले..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics