Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

HEMANT NAIK

Others

4.0  

HEMANT NAIK

Others

भार्या

भार्या

2 mins
194


आज सांगतो गोष्ट तिची रे 

ऐकता नयनी येईल पाणी..

कथा प्रेम अन समर्पणाची 

सर्वांच्या ती घराघरातली..


कथेची मुख्य विशेष पात्र ती 

आधार देते सदैव जीवना ..  

स्वत:पेक्षा फक्त्त दुसऱ्यांसाठी 

जगात अवतरली आहे भार्या ..


अतूट लग्नाचे पवित्र नाते होता 

घर अंगण सखी गणगोत सुटले 

ओलांडता मापं उंबरठ्यावरचे 

अनेकांशी जुळले तिचे नवे नाते ..


सासरी नावही नविन मिळाले

पत्नी सून वहिनी काय ते कळले..

तिच्यावर नित्य अवलंबुन घरचे सारे 

हाऊस वाइफ नाव तिज इंग्रजीतले..


नवलाई कौतुक नव्या वधूचे 

नऊ दिवसांचे फक्त्तच होते..

नंतर घरातील साऱ्या कामाशी

प्रत्यक्षात जन्माचे जुळले नाते..


आवड सर्व नात्यांची जाणून 

जेवण नित्य तिचे रुचकर छान ..

घराच्या शुभमंगल सौख्यसाठी 

तिचे मात्र असे उपवास..


सारे उपवास तिचे फळास आले

घरात हसरे बाळ रांगू लागले..

जन्मभरासाठी ती आई झाली

पित्याचे प्रमोशन पतीस मिळाले..


वय नकळत तिचे वाढत होते

जबाबदारीचे ओझे अधिक वाढले..

ऑफिसवेळ साधण्या धडपडे

मुलाना संस्कार देण्यात ती रंगे..


सर्व व्हावे अगदी बरोब्बर काही

नको उणीव..न करावयाचे बाकी..

ती हुशार सदैव अष्टावधानी 

गॅसवरचे दुध उतू कधी गेले नाही..


सर्वांच्या इच्छा पूर्ण करता करता

दिवस सरला तिज कळे मावळतांना..

समय चक्र हे वेगाने चालत होते

चंदेरी मधूनच तिचे केश चमकले


पप्पूचा आता प्रकाश झाला

बेबी नकळत सुमन झाली 

प्रेमाने प्रेमही कुरकुर करू लागले 

मुलांसह अहोंनाही शाब्दिक चिमटे.


विवाहा वेळी किती अबोल होती

राजास सर्रास आता हुकूम ती राणी देते..

"सरळ घरी वेळेत या लवकरी 

पुरे करा कामाचे खोटे बहाणे!"


लग्नाच्या अनेक वर्षानंतरही

गोड सवय झाली या शब्दाची.

" मीच ती या घरी निभावली

दुसरी कुणी नसती थांबली "


जरी कधी ते भांडण होते

अबोला तो क्षणिक असतो..

ठसका जेव्हा अवचित लागे

जीव तिचा वर खाली होतो..


आजारी ती क्वचितच पडली

कुणा कधी नाही ती कळली..

आजारी जेव्हा घरी कुणी तो

तत्परतेंने सेवेस हजर राहिली..


सर्वांना कौतुक फक्त्त आईचे

ममतेचे प्रेमाचे अन त्यागाचे..

जीवन सफल सुंदर करण्या 

योगदानही खूप प्रिय भार्येचे..


जबाबदारी मागे जेव्हा पडता

देवधर्माशी जुळते नकळत नाते..

आवडती साखर बंद जाहली 

औषधे आता सारे सखे जाहले..


साखर नाही तरी असतें गोडी

पत्नी सोबत तर पती सुभागी..

साथ सदैव तिची सदा रहावी

चंद्र सूर्य आहेत जोवर गगनी.. 


प्रेमाचा डोळ्यात अथांग सागर

आशा दाखवी प्रत्येक क्षण क्षण..

जेव्हा अडचणीत तिचा प्रियवर

खुशाल त्यागे ती आपुले स्त्रीधन..


सारितेची ती खळखळ धारा

तिच्या सोबतीला पती किनारा..

साथ दोघांची अखेर पावेतो

मिळेपर्यंत प्रभूच्या भावसागरा ..


लिहिले खूप महान आईवरती

भाग्यलक्ष्मी भार्या, सर्वं घरांची..

जाणुनी तिची ही अद्भुत महती

शब्द खास, उतरवे हेमंताची लेखणी..


Rate this content
Log in