पायाचा दगड
पायाचा दगड
मंदिराचा उंच कळस
झळकतो नभी छान..
दिसायला कारणीभूत
अनमोल पायाचे दगड..
जो पाहतो कळसाला
अभिमानाने दाटे उर ..
विसरतात सर्वं त्यांना
पायाचे त्याचा जे दगड..
वजन अन खुप भार
करतो सारे सहज सहन..
निरंतर तरी तेथेच राही
पायाचा तो अढळ दगड..
पायाशी नित्य असूनही
त्याच्या उरी अभिमान..
उंच ज्ञान मंदिर ते उभे
भिस्त दगडी पायावर..
पायाशी जरी तो रे
शल्य कधी नाही त्याला ..
कळस उंच बघताना,
जीवना आली सार्थकता..
म्हणूनच सर्वं खरे भक्त
डोके ठेवतात पायरीला ..
आधी नमस्कार पायाला
मंदिरात नंतर ईश्वराला ..
