हिरकणी
हिरकणी
रायगड हा गड
शिवाजी महाराजांचा
प्रमुख किल्ला हा,
त्यांच्या राजधानीचा
गाव वाळुसरे,
गडाच्या तळाशी
तेथे एक धनगर,
कुटुंब प्रेमाने राहशी
दुध, दही विकुन
उदरनिर्वाह करी
हिरकणी नाव तिचे
तिची माया बाळावरी
मायेच्या पाखरांची
उरात धगधग
कोजागरी पौर्णिमेच्या
बाजाराची लगबग
जायचं विकायला
दुध, दही गडावर
गाठायला ठिकाण
पावले पडती भरभर
आज काय अवचित
हा डाव घडला
विसर वेळेचा
कसा तिला पडला
दुध, दही विकता
विकता वेळ गेला
सुर्य मावळून गेला
काळा अंधार पडला
दारापाशी माय आली
लगबगीने
नाही ऐकले म्हणणे
तिचे, द्वारपालाने
नाही शक्य आता
हे दार उघडणे
नाही उपयोग आता
नको गाऊ गाऱ्हाणे
माय म्हणे माझा
बाळ एकटाच घरात
काळजीने वादळ
उठत आहे उरात
पाहुनी, नाही उपयोग
गयावयांचा येथे
काय करू, काय नको
विचार करून फिरे माथे
जागी झाली माता
हिरकणीच्या आतली
घोर धाडस करायला
मातेला भीती नाही वाटली
अभेद तो रायगड
खाली उतरायला जड
वरून खाली बघताच
काळजात होते धडधड
आली बाळाची आठवण
झाले कासावीस मन
ओढ घराची लागली
घेतले अभेद हे आव्हान
उतरली अंधारातच खाच
खळग्यातून, काट्यातून
जखमी झाला सारा देह
भीती सारी वाहिली रक्तातून
रात्रीच गड उतरली
माय बाळासाठी
गड उतरून घरी परतली
भुकेलेल्या चिमण्या जिवासाठी
कसे आपसुकच हे
धाडस घडले
शौर्य हिरकणीचे हे
महाराजांना कळले
घेतले तिला बोलवून
विचारले प्रकरण
कसे केले हे धाडस
काय झाले कारण
महाराज हर्षित झाले
सारा प्रकार ऐकुन
केला सत्कार मातेचा
साडी-चोळी देऊन
उतरली ती माता
ज्या कड्यावरून
केला अमर तो कडा
नाव हिरकणीचे देऊन
नाव बदलले वाकुसरे
गावाचे राज्यांनी
हिरकणी वाडी केली
मायेच्या प्रतापानी
अजरामर जाहली
ही कायमची कहाणी
शौर्य गाथा घडवली
धन्य ती माता हिरकणी
धन्य धन्य ती माता हिरकणी
धन्य धन्य ती माता हिरकणी
