STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

जय भीम

जय भीम

1 min
216

माझ्या भिमाने कमाल केली, 

धुरा धम्माची दुनियेत नेली.

जाती पातीच्या विदळातून, 

होडी प्रगतीची किनारी नेली. 

माझ्या भिमाने कमाल केली. 

रांजल्या गंजलेल्या समाजाला ह्या,

 क्रांतीची हि नवी दिशा दिली. 

माझ्या भिमाने कमाल केली. 

गावरान अनाडी दुनियेच्या हातात, 

शिक्षणाची हि मशाल दिली. 

माझ्या भिमाने कमाल केली. 

मोडलेल्या आपल्या समाजाला, 

प्रगतीची, संघटनेची हि पंखे दिली. 

माझ्या भिमाने कमाल केली. 

राज्यकारभार चालवायला देशाचा, 

त्यांनी,हि राजघटना दिली.

 माझ्या भिमाने कमाल केली. 

आज खातोय दोन हातानी जी,

ती, भाकरीही भिमानेच दिली. 

माझ्या भिमाने कमाल केली. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन