माय मराठी
माय मराठी
धडकतो जो हृदयात,
माझा तो श्वास मराठी.
माझी शान मराठी,
माझी माय मराठी.
लढलो, मरलो,
आम्ही ज्या साठी,
तो आमचा मान,
अभिमान मराठी.
माझी शान मराठी,
माझी माय मराठी.
चाललो आम्ही,
जिच्या पाठी.
ती,आमची,
गीता मराठी.
माझी शान मराठी,
माझी माय मराठी.
या भाषेची हि,
किर्ती मोठी.
देते अम्हास,
सन्मान मराठी.
माझी शान मराठी,
माझी माय मराठी.
शब्द सुमनांच्या
ह्या रेशम गाठी.
साहित्याचा अफाट
खजिना आहे मराठी.
माझी
शान मराठी,
माझी माय मराठी.
सह्याद्रीच्या द-याखो-यात
पदोपदी जी भेटी.
मराठ्यांची मराठमोळी,
मराठ्यांचा मान मराठी.
माझी शान मराठी,
माझी माय मराठी.
फडकतो जो अटकेपार झेंडा, त्याची लाठी मराठी.
दिल्लीचे हि जो तख्त राखतो,
तो महाराष्ट्र मराठी.
माझी शान मराठी,
माझी माय मराठी.
तन,मन,धन अर्पण,
ह्या भाषेसाठी.
माझी रित मराठी
माझी प्रित मराठी.
माझी शान मराठी.
माझी माय मराठी.
शतशः प्रणाम ह्या भाषेला.
माझी शान मराठी
माझी माय मराठी.