STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Crime

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Crime

दहशत

दहशत

1 min
217

पाकळ्यांना उमलण्याची का दहशत झाली,

अंकुरातच स्वतःला दडपून देण्याची का पाळी आली.

फुलावे कसे,का कोणासाठी हा एकच प्रश्न,

फुलण्याची उमेद ना जाने कोठे गेली.

फुललो की लगेचच लोकांच्या नजरेत भरणार,

फांदीला सोडण्याची भीती नाही मनातून गेली.

सुहास जरा दरवळला वातावरणात तो काय,

नजर लगेच बघ्यांची आपसूक सरसावली.

तोडणार,जोडणारा नाते जगातले फुलण्या आधीच,

कोमेजून टाकली ती कळी जी, कधी फुल नाही झाली.

फुलांचा सुहास घ्यावा, सौंदर्य निरखावे त्या फुलांचे,

पण हा न्याय कुठला की, अंकुरांवरही दया नाही केली. 

कळीने काय गुन्हा केला, का तिला दिले नाही फुलून,

का जगण्या आधीच तीच्या आयुष्याची माती केली.

कोणा एकाचे,कधी आनेकांचे हात सरसावतात तिच्याकडे,

पाकळ्या कुस्करताना तीच्या का कोणीच गय नाही केली.

का, कळीला फुलण्याचा, उमलण्याचा हक्क नाही,

का ती विनाकारण वासनेच्या वणव्यात बेमौत जळली.

तिला फुलून देऊ या, प्रण करू या तिला जगविण्याचा,

करा ही प्रतिज्ञा आजच, ज्यांनी,ज्यांनी अजून नाही केली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime