ते बंध का रूसले
ते बंध का रूसले
ते बंध का रूसले
नको हे वादळ असले
भुईसपाट सारे झाले
क्षणात सारे फसले
नको तकलादू नाती
जिथे सारेच बेरंग
दिखाऊपणा वरवरचा
तालात सारे आपल्या दंग
निखारे मांडून वाटेवर
पाहती सारे तमाशा
पोळलेल्या जखमांवर
पिकवती एकच हशा
नका करू निंदा कुणाची
हिनवून दाखवू नका वाकडे
दाखवा समजुतीचा स्वर
एकच घालते तुम्हा साकडे
