हिंगणघाट प्रकरण
हिंगणघाट प्रकरण
हिंगणघाट प्रकरण अंतिम दिवसाची व्यथा
जमलेल्या जमावाला माझं
एकच विचारणं आहे
वैचारिक महामानवांचा हाच तो
पुरोगामी महाराष्ट्र आहे?
आज माझ्या अंतिम विधीला
का इतका टाहो फोडता?
भर चौकात मला जाळेपर्यंत
फक्त चित्रफितीच आल्या का काढता
जळून गेलंय शरीर माझं
त्याच दिवशी आता का जाळताय
मुलीने जन्म घेतलाच हा गुन्हा की
फक्त सुतकाचे दिवस पाळताय
स्वतःच्या विद्रुप चेहऱ्याला
पाहण्याची पण इच्छा नव्हती
समाज जागा होणारच नाही
कारण पाश्चात्य संस्कृती भोवती
मी तरी संपले, बाकीच्या बहिणींनाही
ही वेळ येईल कदाचित
असे अनेक प्रकरण पडलेत कोर्टात
माझी case पण राहील वंचित...