बाप माय आन पोरं
बाप माय आन पोरं
1 min
324
बाप आणि आईचं आपल्या
लेकराला सांगणं हाय
भविष्याचा गाडा तुला
स्वतःला वडायचा हाय
कोणाच्या मागे फिरून
का म्हणतो? दादा, भाय
तुला लहानाच मोठं केलं
त्या म्हाताऱ्याला नग इसरतो का काय
भविष्याची चिंता तुला
लागते का नाय
अश्या तुझ्या वागण्यानं
आम्हाला लावशील पकडायला कोनाचंतरी पाय
तुझ्या नाराजीला पाहून
हातभार मोठा मोबाईल घेऊन दिलाय
त्याला सोबत घेऊन एकदातरी
रानाकडं चक्कर मारून पहाय
माझ्या घामानं फुलवलेला मळा
दुष्काळात होरपुन जाय
शिकून मोठा झाला तर
तूच बनशील आमच्या आधाराची सावली रं माझी माय
म्हणून म्हणतोया अश्वारूढी रथ तुलाच वडायचा हाय
