mpsc एक प्रतिशोध
mpsc एक प्रतिशोध
माझ्या महिन्याच्या हिशोबाच
झालं व्हतं मोजमाप करून
3 दिसाच्या तयारीत झाली व्हती
सपनं भी माझी सरून
केलं व्हतं म्या सगळं दैनंदिनी ला धरून
या येळला व्हईल आपलं बी म्हणून गबाळ झालं व्हतं 2 पोती भरून
माझ्या जेवणाचा डबा बी आला व्हता रूमवर मित्राच्या
जावं आता सगळं घेऊन म्हणून निघालो
प्यायला टपरीवर चहाच्या
सगळं कसं येळत व्हतंय ही मनाला व्हतं पटीवलेलं
येवडा कालवा पेठत बगून मनाला वाटलंच
कायतर नक्कीच झालंय जी
हे वातावरण नसतंय एवढं
ढवळलेलं
अचानक एका जीवलगानं
नेलं हाताला वडून
कोण आडवा पडला व्हता ,
तर कोणाचं सहन होत नव्हते झालेलं हाल रडून
माझ्या रंगवलेल्या भावना 5 व्या येळस गेल्या जळून
म्या पण लोकसनी धीर देणारा,
तोडक्या मोडक्या परिस्थितीला सांभाळून
महिन्याकाठी अर्थसंकल्प भागवणारा
पण कुठलाच भास मनाला समजत नव्हता
की स्वप्न अशी दूर जातील क्षणात पळून
नेमकं कधी हुइल स्वप्न पुर्ण
मला पण बगायचय माझ्या माय बापाला
अभिमानान गेलेलं हुरळून.....