STORYMIRROR

Rushikesh Pawar

Inspirational Others

4  

Rushikesh Pawar

Inspirational Others

तू हे करू शकतो

तू हे करू शकतो

1 min
221

रंगमंचावर वातावरण तयार होण्यासाठी वाजंत्री वाद्य वाजवितो

माझ्या उज्ज्वलतेसाठी माझा बाप इमानदारीने जगतो मलाही इमानदारी शिकवतो


हे जगसुद्धा अडकलेय लालचेच्या अद्भुत जाळ्यात

आता माणुसकीच आणावी लागेल विकत मोळ्यात


प्रत्येकाला आपल्या मोठेपणावर गर्व आहे अमाप

किती लाभ घेशील रे नुसते सोडून तोंडातून वाफ....


कोणाच्या मागे बोलून जर मनाला शांती वाटत असेल

तर निश्चित बोलावे...

पण आपण एक इमानदार माणूस असल्याचे

स्वतःच्याच मनाला कसे पटावे...


एखाद्या व्यक्तिमत्त्वावार बोलायला स्वतःचीही कुवत लागते...

त्यासारखे न बनावे परी बोलण्यात शर्मेने तरी घ्यावे उरते...


स्वतःला सिद्ध करताना आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो...

आत्मविश्वासाने जगतोस तर अशा पोकळ धमक्यांना का भितो...


स्वतःच्या पायावर उभारून कमाव तुझं नाव...

तुझ्या विजयावर शिक्कामोर्तब करायला तू निडर धाव...


आपल्याला पण आयुष्यात तेवढीच मिळते वो जेवढी आपण इतरांना देतो इज्जत...

आपल्याही मनात श्रद्धा व नम्रता असेल तर दिव्यासारखा संयम ठेवावा विझत...


तुला जे ज्ञान आहे ते वाटून टाक निडर

ज्ञानवाटपाच्या दुनियेत निर्विघ्नपणे होऊन जाशील लीडर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational