STORYMIRROR

Rushikesh Pawar

Action Crime

3  

Rushikesh Pawar

Action Crime

ताईला न्याय मिळाला

ताईला न्याय मिळाला

1 min
302

निष्पाप लेकीवर करुनी

हिंसक राक्षसी अत्याचार

देव मोजतोय वरून

त्यांच्या अन्यायाचे भार


त्यास वाटली नसेल

थोडीतरी लाज

चिमणीसारख्या जीवाला

जाळण्यापर्यंत कसला माज?


धगधगत्या त्या आगीमध्ये

तिच्या स्वप्नांची राख झाली

काय चुकले त्या कर्तव्यदक्ष पोलिसांचे

न्यायासाठी केली त्याने बंदूक खाली


ताई तुझ्या वेदनांनी

तळपला हा देश सारा

त्या नराधमांचा घेतलाय जीव

तरीपण मनात आत्मक्लेशाचाच वारा


त्या षंढांना समाजात जगण्याचा

नाही किंचितही अधिकार

मग घटनेच्या विरोधात बसून

जरी केले असतील वार

वर्दीतल्या भावांचे मनस्वी आभार!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action