STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Crime Others

4  

Author Sangieta Devkar

Crime Others

म्हणूनच म्हणते मी...

म्हणूनच म्हणते मी...

1 min
361

म्हणूनच म्हणते मी मुली, आता येऊ नको तू जन्माला

जागोजागी छुपे राक्षस इथे, बसलेत तुझे लचके तोडायला


चार वर्षांची बालिका नाहीतर साठीची वृद्धा

फरक नाही समजत या सैतानांना, त्याचे सावज समोर दिसता


नटून थटून तू जाऊ नकोस, नजरेला नजर देऊन तू बोलू नकोस

नाहक बळी जाईल तुझा, प्रत्युतर तू कोणाला करू नकोस


मुलगी म्हणजे लक्ष्मी, मुलगी असते घराची शान

याचं तरी समाजाला आता राहिलं आहे का भान?

अन्यायाविरुद्ध पेटून उठू नकोस, कापली जाईल तुझीच मान


रस्त्या रस्त्यावर मोर्चे निघतात दाखवतात सर्वजण एकी

अत्याचार तुझ्यावर होताना, कुठे असते मग ही माणुसकी?

का नाही आठवत तेव्हा तुम्हाला तुमच्या घरच्या लेकी?


होऊ नकोस तू सैरभैर, शांतही तू राहू नकोस

अबला बनून आता मुकाट अन्यायही सोसू नकोस


घेऊन रूप चंडिकेचे माजव आता हाहा:कार

निपटून टाक होणारा, तुझ्यावरचा अत्याचार


दाखवून दे जगाला वेळच आली तशी तर,

बांगड्या भरणारे मनगटंसुद्धा, पेलू शकतात शिवबाची तलवार, शिवबाची तलवार....!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime