पण शेवटि का ???
पण शेवटि का ???
...आज एका भावाला बहिन म्हणाली
दादा तु जसा आहे तसेच या जगातले
बाकि पुरुष का नसतात रे...
ते येणाजाणाऱ्या पोरीकडे कडे का
उगं वरुनखालुन बघत बसतात रे...
....काल मी बाजारात भाजी पिशवीत
टाकण्यासाठी जेव्हा वाकली होती..
तेव्हा तु माझी ओढणी व्यवस्थीत
करुन झाकली होती ...
कारण दादा समोरचा माणुस छातीकडे
माझ्या वेगळ्या नजरेने पाहत होता
त्याला पण आईबहिण असेल ना
त्यांच्यासोबत तो राहात होता....
.... तुला सांगायचंय राहिल दादा
मी परवा बसमध्ये बसुन
शाळेला जात होते
तेव्हा एक माणुस बसला होता
नी माझ्या मांडीवर हळुवार स्पर्श
करत किळसवाणा हसला होता...
...काल आम्ही कपडे घ्यायला गेलो
तेव्हा परत जाताना एका तरुणाला
नकळत लागला माझा धक्का
" का आईटम आहे रे हि "
असे तो मित्रांसोबत हळुच बोलले..
का रे दादा त्यांनी मला एखाद्या
दुकानात विकायला ठेवलेल्या
वस्तुसारखे तोलले....
