STORYMIRROR

Pallavi Udhoji

Crime

4  

Pallavi Udhoji

Crime

भरकटलेली मी निर्भया

भरकटलेली मी निर्भया

1 min
501

माझा काय गुन्हा 

मी पण तुमच्यासारखीच होती ना?

माझा प्राण गेला दुःखी झाले माझे माय-बाप

अजूनही न्याय मिळाला का मला?


प्रचंड वेदना झाल्या तेव्हा 

गुन्हेगाराच्या जबड्यात सापडली मी

दिसतंय मला या धरतीवर 

गुन्हेगार मोकाट फिरतोय दुसरी निर्भया शोधण्यात


दुसरी निर्भया पुन्हा होवो 

काळजी नसे न्यायाला

तारीख वर तारीख दिली जाते 

तोवर पुन्हा एखादी निर्भया 

कचाट्यात सापडेल का एका नराधमाला?


आज, उद्या पुन्हा कोणी बळी ठरेल 

केव्हा थांबेल हे सगळं सांगा तुम्ही आता 

सहन मी केलं, वेदना झाल्या मला, 

नराधमांना शिक्षा करायला 

केव्हा जाग येईल न्यायाला


अहो जिथे सितेलाच न्याय मिळाला नाही 

मी तर एक सामान्य स्त्री 

हे सगळे जेव्हा थांबेल तेव्हाच 

खरी मिळेल मला श्रद्धांजली 

तेव्हाच खरी मिळेल मला श्रद्धांजली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime