श्रावण सजला
श्रावण सजला

1 min

478
खूप सुंदर श्रावण सजला
कवितेमधे अलगद मुरला
ओलसर त्या पहाट वेळी
प्राजक्तही मनी लाजला
सावरताच धवल सर्वांगा
केशरासह तो लडखडला
केवड्याने कात सोडता
काट्यांसही दरवळ फुटला
मोगरा निपचित या प्रहरी
मिटूनी कळी शांत निजला
भिजून येता दवात शब्द
पानांवर सुगंध सांडला
रानांत बहर फुलांत बहर
बहर मना मनात बहरला
व्रतवैकल्ये मनी ठसवुनी
श्रावण हा पुन्हा प्रकटला
खूप सुंदर श्रावण सजला
कवितेमधे अलगद मुरला