सजली ही राने वने
सजली ही राने वने
1 min
175
रंग हे आभाळाचे
सजली ही रानेवने
हिरवळीच्या सुगंधाने
गंधित झाली ही वनराई
सरसर येता थेंब
पावसात घेत झुले
लाटा उठूनी उत्साहाच्या
किरणातूनी ऊन पडे
कंठातूनी गाणी उमटती
पाखरांसह भुल पडे
निसर्ग सारा गातो गाणी
रोमांचित मन हे झाले
झाडे ही फुले ही
हवा ही धुंद झाली
हिरव्या ह्या झाडाखाली
झाले मी बेभान भारी
