STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

कोजागिरी

कोजागिरी

1 min
374

निळ्या आकाशी स्वच्छद बघा

चंद्र भासे मज हा ग वेडा


धुंद होऊनी नभी विहारी

घाली धवल दुधाचा सडा


खुळ्या सावळ्या नभा कळेना

कुठूनी असा सांज रंगला


मेघ दाटले हे नभीवरी

हळूच हा कापूस पिंजला


भासे मज हा चंद्र निराळा

जणू तुझा चेहरा लाजरा


मखमली इथे स्पर्श तुझा

नव्यानेच एकांत भासला


चंद्राचे तेज रूप लागावे

शुभ्र ही कोजागिरी पौर्णिमा


सूर तुझे हे मनी गुंफता

मग्न ही स्वरमयी कांठीका


तुझे नि माझे नाते जुनेच

दाट दिसे घट्ट दुधापाई


गंध त्यावरी हा केशराचा

नवे रूप कोजागिरीपरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन