अनुबंध हा प्रेमाचा
अनुबंध हा प्रेमाचा
आयुष्याच्या ह्या रंगमंची
दुःख प्रत्येकास असत
हास्य हे क्षणभंगुर
दुःख कायम साचत
सोडून तू मला गेली
मनास आज पटतं
माझ्या श्वासात तुझे
पैंजण रोज वाजतं
नको पाश मजला हे
मोह माया मी सोडली
नको वेठीस धरू तू
आग मनात दाटली
भाग्य इथे प्रत्येकाचे
हृदयात हे साठते
माणसाची ही नजर
मना मनात वाचते
अनुबंध प्रेमाचा मी
मनात माझ्या बांधला
दुःख माझे मी आता
कंठात मी हा दाबला