STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

कविता कशी असावी

कविता कशी असावी

1 min
427

कशी असावी कविता?

कविता खरी असावी

दवात भिजलेल्या ही

पुष्पापरी ती दिसावी..१..


कवितेचे शब्द येता

सत्यात तीच दिसावी

हळवे शब्द दाटूनी

शब्दावरी ती भिजावी..२..


कवितेतील अर्थ हा

मनातच हा भासावा

दाद डोळ्यामधूनी हा

एकाच्यातरी कळावा...३...


वाचूनी प्रश्न पडावे

उत्तरही गवसावी

शब्द चुकले तरीही

भावनाही मनी यावी...४..


संपलेल्या मैफिलीत

कोणी माझ्यासाठी गावी

बंद डोळ्यात ती फक्त

फक्त तिलाच दिसावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन