आठवांचा झुला
आठवांचा झुला

1 min

195
तुझ्याविना झुले आठवांचा हिंदोळा
ओथंबले दु:ख जरी सुगंधी या कळा
व्याकुळला कसा आज संधीकाळ
हरवल्या क्षणांची फुले दिपमाळ..१
झर्यातून येई जुन्या दिवसाची हाक
असेल का आज तरी कुणी तिथे एक
तळ्याकाठी फांदीवर बोलावितो काक
अनाठायी उगा लागे जिवाला या धाक..२