चांदण्याची चादर
चांदण्याची चादर
1 min
406
पांघरून चांदण्यांची चादर,
स्वप्न सुगंधी असे उशीला,
मोरपिसांची ढाळी चंवरी,
खट्याळ-मिश्किल मंद वारा.
क्षितिजावर्ती किल्बिल किरणे
चिमण्यांचे अन् चिवचिव गाणे,
सुवर्णरथाचे खळखळ हंसणे,
तल्लीन स्वरांची ती भूपाळी
कुणी गातसे नित्य सकाळी
सूर्य-चंद्र असता साक्षिला
दुरून खुणा कां करते मजला?
भावफुलांची करून उधळण,
सत्वर सुचावे काव्य मनाला,
टिपू नये ती घार क्षणाला !