कसा कुणास हल्ली...
कसा कुणास हल्ली...


कसा कुणास हल्ली,मागून वार झाला
दंगलीत रावणाच्या,तो राम ठार झाला
सत्ताच आज सारी,शक्तिमान भारी
तो वर्ग नौकरांचा,भलताच गार झाला
होतात वेदनांचे,सौदेच रोजच्याला
काट्यास दोष नाही,फुलांचा मार झाला
डोळ्यांत आसवांची,बरसात होत नाही
अश्रूही तो फुकाचा,नयनांस भार झाला
राक्षसी वाण त्यांचे,नेते असो पुढारी
खादाड राजकारणाला,हातभार झाला
अतृप्त एकटा मी,हे मानूनी शांत होतो
पोशिंदाही भुकेने,पार थंडगार झाला