STORYMIRROR

RASHTRAPAL NAKTODE

Others

4  

RASHTRAPAL NAKTODE

Others

"माझ्यातला मी"

"माझ्यातला मी"

1 min
259

त्या रेशमी सुरांना छेडीत पुढे गेलो

निराधार त्या मनांना जोडीत पुढे गेलो।।


अंधार खूप झाला प्रकाशास वाट नाही

लखलख काजव्यांना जोडीत पुढे गेलो।।


का एकटे सहावे अतोनात दुःख त्यांनी?

नवजात त्या कळ्यांना फुलवीत पुढे गेलो।।


नाजूक स्वप्न माझे तिने तोडले क्षणात

पाकळ्यांना त्या गुलाबी वेचित पुढे गेलो।।


गावात अमीरांच्या कफल्लक एकटा मी

भिकारी त्या मनांना तुडवीत पुढे गेलो।।


नशिबाचा यात माझ्या अजिबात हाथ नाही

"माझ्यातल्या मी" ला ढकलीत पुढे गेलो।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन