प्रेम
प्रेम
प्रेम म्हणजे काय असते
कुणाला कळले
प्रेमाने त्यांनाच छळले
ज्यांच्याशी ते जुळले।।
मनाशी माझ्या ते जुळले आहे
म्हणून मला कळले आहे
प्रेम माझे होताच दूर
मन क्षणोक्षणी रडले आहे।।
प्रेम कुणाला सांगून होत नाही
नकळतच ते वाढत जातं
कधी होतो प्रेमाचा करार
कधी मनातच घुटमळत जातं।।
एक तरंग जो हादरून टाकतो मनाला
एक लाट बिथरून टाकते जीवनाला
कधी असतो आनंदीआनंद अपार
कधी मारतो हाका दुःखद क्षणाला।।
प्रेम हे जीवनातील वास्तव आहे
प्रेमात पडलेल्यांचे मन अवास्तव आहे
कधी भोवतात अफाट नरकयातना
तर कधी स्वर्ग वास्तव्य आहे।।

