STORYMIRROR

RASHTRAPAL NAKTODE

Romance

3  

RASHTRAPAL NAKTODE

Romance

"प्रेम तुझे आहे कसे ?"

"प्रेम तुझे आहे कसे ?"

1 min
115

प्रेम तुझे आहे कसे?

सांग माझे सखे।।


दुरूनीच पाहता तुला,

मन उधाण होई

चोहीकडे भासे मला,

हिरवी वनराई

तू जीवनाचे चक्र माझ्या

तूच काळजाचे धागे।।


राहावे तू बसून जवळी

असे वाटते ग आज

डोळेभरुनी बघत बसावा

तुझा तो ग सप्तसाज

चालता चालता वाटे

यावे तू धावत मागे।।


वारा जसा येई जवळी

स्पर्श त्याचा होई

डोळे मिटताच सखे

तुझा भास होई

वाटे वारा खेळत राहो

माझ्या पुढे मागे।।


प्रेम तुझे आहे कसे?

सांग माझे सखे।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance