52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
ही प्रेमाची बाग बहरली
गंध प्रितीचा दरवळू दे रे,
चल उनाड वा-यासंगे
सुगंधाचा आस्वाद घे रे.
या बागेत झुलायला तू
सख्या प्रित झुला दे रे..
चल उधळू रंग प्रेमाचे
दोघे मिळून रंगूया रे,
रंगात रंगूनी आपण
गोड स्वप्नात दंगूया रे.
या स्वप्न झुल्याला तू
सख्या प्रित झुला दे रे..
सुखी संसाराचे छान
एक घरटे बांधूया रे,
गुंफूनी प्रितीची विण
दोघे संसार सांधूया रे.
या संसार झुल्याला तू
सख्या प्रित झुला दे रे..
विश्वास रुपाचा डोंगर
दोघे मिळून तोलूया रे,
घे समजून मला तू अन्
घेते समजून तुला मी रे.
या विश्वास झुल्याला तू
सख्या प्रित झुला दे रे.

