दिसतेस तू.....
दिसतेस तू.....
डोळ्यात तू माझ्या काळजात तू
जिकडे मी पाहतो तिकडे दिसतेस तू.....
माझ्या प्रेमाला तूझी आशा कळाली
गुलाबा सारख काय गोड हसतेस तू....
माझ्या स्वप्नांत येतो तुझाच चेहरा
मला पाहून इतक का लाजतेस तू....
तुझ्यात मन माझ माझ्यात मन तुझ
काळजाच्या टोक्यावर जाणवतेस तू.....
फुलासारखा आहे तुझ्या प्रेमाचा सुगंध
हसत माझ्या जीवनात दरवळतेस तू....
हा वेडा संगम करतो तुझीच गुलामी
अस रागावून का माझा जीव घेतेस तू....

