परी आणि बायको
परी आणि बायको
सगळ्यांनाच आपली बायको परी वाटते.
चुकून जरी स्वप्नात आली तरी खरी वाटते.
शक्तीचे म्हणाल तर,
परिकडे जादूची छडी असते.
बायकोसाठी झाडू आणि लाटनेच पुरेसे असते.
सुंदरतेच्या बाबतीत गोष्टीतल्या परिपेक्षा मला बायको जास्त आवडते.
जेव्हा ती नऊवारी नेसून माझ्या सोबत पुजेला बसते.
चमत्काराची कोणतीच अपेक्षा नाही कारण,
तिचे आयुष्यात येणे चमत्कारापेक्षा कमी नाही.
परीचे काय ! ती फक्त स्वप्नातच दिसते.
पण मात्र बायको कायमची सोबत करते.
तरीदेखील का ? माहीत नाही.
सगळ्यांनाच आपली बायको परी वाटते
चुकून स्वप्नांत आली तरी खरी वाटते

