अपेक्षा एवढीच की विंडो सीट नाह
अपेक्षा एवढीच की विंडो सीट नाह
1 min
384
अपेक्षा एवढीच की
विंडो सीट नाही पण चौथी सीट मिळावी
निवांतपणे बसल्यावर आयुष्याची गणितं जुळावी
आरे ला कारे करण्याची हिंमत करावी
की शाळेच्या वाढत्या फी बद्दल विरोधी भूमिका घ्यावी
डिजिटल इंडिया च्या सहाय्याने कॅशलेस व्यवहाराची हमी घ्यावी
की बँकेत घोटाळे होतात म्हणून कॅश च घरात आणून ठेवावी
वाढणाऱ्या बेरोजगारीवर फक्त बोलणाऱ्याची भूमिका असावी
की मिळणाऱ्या पगारावरचा GST calculate करण्यात रात्र घालवावी
सामाजिकतेचे भान ठेवून येणारी घटका जगावी
की सगळं विसरून वैयक्तिक आयुष्यात स्वतःचीच स्पेस कायम रहावी
कळत नाहीये नेमके काय करू
