STORYMIRROR

vijay chavan

Others

4  

vijay chavan

Others

पावसा तुझ्याशी थोडे बोलायचे आहे

पावसा तुझ्याशी थोडे बोलायचे आहे

1 min
407

पावसा तुझ्याशी थोडे बोलायचे आहे

त्या आधी हे सांग, तुझे शेड्यूल किती पॅक आहे


प्रत्यक्ष भेटणे शक्य नसेल तर मेसेज करू का? 

फक्त तुझा रिप्लाय असा नसावा की, 

मी आता बिझी आहे नंतर कॉल करू का?


मुंबईसाठी तुझ्या बरसण्याचा दिवस म्हणजे वीकेंड आहे

पण जर तू माझ्या गावाकडे नाही बरसला तर,

माझ्या बळीराजाच्या आयुष्याचाच दी एंड आहे


तू बरसत असताना तिच्यासोबत चिंब भिजायचे आहे

अजून थोडा वेळ सोबत करशील का?

कारण तिला अजून यायचे आहे


सुटीच्या दिवशी रिसॉर्टला न जाता नैसर्गिक पिकनिकला जायचे आहे

प्रोफेशनल लाईफची सो कॉल्ड चौकट मोडून,

एका दिवसाचे आयुष्य मनमुराद जगायचे आहे

बघ! मला किती बोलायचेे आणि करायचे आहे


त्याआधी हे सांग, तुझे शेड्यूल किती पॅक आहे


Rate this content
Log in