STORYMIRROR

Gauri Deshpande

Romance

4  

Gauri Deshpande

Romance

रेशीमगाठी

रेशीमगाठी

1 min
638

मोगऱ्याची ओंजळ रिकामी करताना

तुझा झालेला हलकासा स्पर्श...

अंगावर आलेला सरसरून काटा

अन मनात न मावणारा हर्ष ।।

नजर झुकलेली

ओठही मिटलेले

तरीही असंख्य भाव

डोळ्यात साठलेले ।।

शब्दातल्या भावना

त्या भावनांचे अर्थ,

सारेच होते त्याक्षणी

निरर्थक आणि व्यर्थ ।।

तुझ्या चेहऱ्यावरचे ते हास्य

अन निरागस, शांत डोळे

मन भरून अनुभवताना

माझे डोळे मात्र किंचित ओले ।।

वाटत होते घ्यावा

हातात तुझा हात

अन विसरून जावे क्षणात

दिवस आणि रात ।।

अन अचानक पडली

तुझी आश्वासक मिठी

विश्वास,प्रेम,मैत्रीच्या

बांधत रेशीमगाठी ।।

असे क्षण येतंच रहावेत

तुझ्या माझ्या आयुष्यात,

अन आयुष्य तुझे माझे

न्हाऊन निघावे मोगऱ्याच्या सुगंधात ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Gauri Deshpande

Similar marathi poem from Romance