STORYMIRROR

SANJAY SALVI

Romance

4  

SANJAY SALVI

Romance

पहाटेच्या कुशीत ...

पहाटेच्या कुशीत ...

1 min
327

पहाटेच्या कुशीत होतो मी खुशीत,

पहिले मी स्वप्न एकमेकांच्या मिठीत,

जाग आली मला मलमली स्पर्शाने,

तुझ्या मधाळ गुलाबी ओठाने,

       थोडासा आळस थोडी टंगळ मंगळ,

       झोपेचा पुरता सरला नव्हता अंमल,

       आंघोळ उरकताच वाफळलेला चहा,

       बशीभर उन उन कांदा न पोहा,

दोन प्रहरी झाले सुग्रास भोजन,

आराम खुर्चीत झुलता थोडेसे वाचन,

झुलता झुलता लागली डुलकी,

त्यानंतर पुरी झाली झोपेची हुक्की,

        फेसाळत्या कॉफीची ओठी असता चव,

        फिरायला जायचा तुझा प्रेमळ आर्जव,

        बाहेर पडलो न बागेत गेलो,

        झाडाखाली बसलो गप्पांत रमलो,

सांजवेळ होता फिरलो माघारी,

आपसूक पाय वळले अपुल्या घरी,

रात्रीला होते भात आणि वरण,

भरवता एक मेकां झाले समाधान,

        मुखशुद्धी साठी तुझ्या हातचे पान,

        मीही माळला तुझ्या केसात गजरा छान,

        येता तू खुशीत आलीस तू मिठीत,

        पहाटेच्या कुशीत होतो मी खुशीत !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance