प्रेमाची वाट
प्रेमाची वाट
पाहता तुला आठवती
त्या पहिल्या वाहिल्या भेटी
दूर तु जाता अशी
राहल्या त्या अपुर्ण साऱ्या भेटी.........
तुटता प्रेमाची नाती
अश्रु ना थांबती
नाती ती कोवळी
ऊन सावलीशी होती.......
हृदयाचे बोलणे अश्रु सांगती
स्वप्न तुझे या मनी होती
जागता मी जराशे
वाटली तु भास होती........
भेटशील तु पुन्हा
जान ही मला होती
परतुन येशील पुन्हा
वाट ही प्रेमाची होती........