STORYMIRROR

Nayan Aswar

Tragedy

4  

Nayan Aswar

Tragedy

भाकरीची भुक

भाकरीची भुक

1 min
332

रोज रोज कसली काळजी

शोध जिकडे तिकडे त्याची

तहान ती साऱ्या जगाची

भुक ती अशी भाकरीची....... 


व्हावं काही आस मनाची

जिद्द झोपेत स्वप्नांची

कोवळे हात पसरली आशेची

थांबली रेषा भाकरीवर नशीबाची

भुक ती अशी भाकरीची......... 


कधी भागली अर्धा चतकोरी

तर कधी पाणीच भुक खरी

गोडव्याची चव नाही जरी

परि आनंदाशी गाठ दुहेरी

भुक ती अशी भाकरीची........ 


जिव थांबले झटून काही

भरले न पोट अर्ध्याहून जराही

चेहरे हरले स्वाभिमानी

गळे बांधुन सुटले नाही 

वेदना नमल्या अजुन नाही

लागली भुक ती अशी भाकरीची......... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy