प्रेम श्वास
प्रेम श्वास
क्षणही थांबले पाहुनी
डोळे अश्रूची झुंजनी..
न कळे अश्रूना ही
बंध ती ओलाव्याची..
घात झाले हृदयी
श्वासही उरला नाही..
उरे ओलावा मनी
मिटता ही पापणी..
स्वप्न गेले निघूनी
वादळे होऊनी..
विखरली नाती सारी
जीवही थांबला नाही..
दूर गेले जवळूनी
हरवली आस नाही.....
श्वासाने जरी सोडले हृदयी
त्यासी प्रेम न सोडे तरी......
