प्रश्न
प्रश्न
दुसऱ्यांकडून का अपेक्षा ठेवायची
आपली जिद्द आपणच जीवंत ठेवायची
हातावरची रेषा का वाचायची
हातात संघर्षाची डोर ठेवायची
उद्याचे भविष्य आज का बघायचे
मिळालेले आत्ताचे वेळ अनुभवायचे
गेलेल्या आठवणीत का जगायचे
येणाऱ्या काळासाठी तयार रहायचे
कागदाला यवढे महत्व का द्यायचे
मानसाच्या मानुसकीला श्रीमंत करायचे
अपयशाचे ओझे का वहायचे
विश्वासाने यशाला मिळवायचे
डोळे मिटूण स्वप्न का बघायचे
खंबीर संघर्षाने ते साकारायचे
आयुष्यात खचून का जायचे
संकटात आपणच आपले मित्र बनायचे
जीवन असेच का जगायचे
ऊंच धेय त्याला गाठायचे