STORYMIRROR

Nayan Aswar

Others

3  

Nayan Aswar

Others

बोलकी स्याही

बोलकी स्याही

1 min
395

ओली पाऊले चालुन आली आजच्या प्रहरी

गर्दी ती ओठांवर झाली हसुन चेहऱ्यावरी

हात धरुनि चालली ती सावली तिच सावरी


विसरी सावली जरी, न विसरे कालची बंधने सारी

जमली सारे क्षण आज मायेच्या पदरी


रंग काही भरले मी तुझ्या आयुष्या किनारी

नावेत तुझ्या सोबती बघते स्वप्न मनात दाटनारी

सावली तु माझी, बांधली हळदी धाग्यानी

नाते तुझे माझे असे सात जन्मी गाठणी


न हरली न हरवली तु आस काही

दुःख स्पर्षुण गेले, न उमले तुझ काही


ओठी होते शब्द काही

बोलके न ते जराही

म्हणुनी उतरले स्याहीत सारी


Rate this content
Log in