फुलपाखरू
फुलपाखरू
1 min
498
जगमगती गर्दी ताऱ्यांची
क्षणात चमकली चांदनी रूपाची
पायरी ओलांडी पहिल्या पाऊलाची
ओळख तुझी नव्या जगाशी
भेटी गाठी चौफेरी दिशांची
चाहुल तुझी ऋतुंसारखी
कधी तु ऊन सावली
तर कधी बरसणाऱ्या पावसासारखी
कधी कधी मनात हसायचे
स्वप्न काही जसे फुलपाखराचे
पंख त्याला रंगाच्या सिहाईचे
झेपणार अवकाश यशाचे
शब्द काही जुळले जरासे
जे वाटले तुला हवेसे
क्षणी या बोलावे कसे
म्हणुनी उतरले ओठांवरून सारे