STORYMIRROR

Rucha Rucha

Romance

4  

Rucha Rucha

Romance

पाऊस आणि ते दोघे

पाऊस आणि ते दोघे

1 min
291

पावसाच्या सरींची

चाहूल लागता मनी

इतक्यात छत्रीची

नको सख्या घाई।।


चिंब होऊन भिजू

गाऊया प्रेम गीत

मोत्यांपरी सुंदर थेंब

झेलू दोघे ओंजळीत।।


थेंब हे पावसाचे

गातील आपले गीत

प्रत्येक थेंब थेंबाने

बहरेल आपली प्रीत।।


पावसाच्या स्पर्शाने 

फुलली जशी हिरवळ

प्रेमाच्या सुगंधाने 

चोफेर पसरेल दरवळ।। 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance