मेळ दो मनांचा
मेळ दो मनांचा
1 min
220
काम सारे बंद झाले
मंद झाल्या साऱ्या खुणा
पायवाटा संथ झाल्या
हाक मारी मन कुना।।
साद आली आर्त कानी
ध्यानी ते मज राहिले
पाहिले हळूच तिकडे
मन तिथेच राहिले।।
थोर झाले भावभोर
मोर जीवनी दुरावले
जीवनाचे हार जित
नयनी तिच्या पाहिले।।
स्पर्श तुझे मज जाहले
मन माझे हे सुखावले
वाऱ्याचे ते थंड झोत
तन मनाला झोंबले।।
मेळ झाला दो मनांचा
खेळ चालू जाहले
त्या मनाने या मनाचे
दुःख सारे साहले।।
