खऱ्या प्रीतीची ओळख हीच!
खऱ्या प्रीतीची ओळख हीच!
1 min
298
तोच मी तीच तू आजवर
आज एक ते झालो आपण
साऱ्या जगातील मनावर
मने कैक ते झालो आपण।।
आज आपुली जुळली गाठ
तुझ्या मनाशी माझ्या मनाची
एक झाली हरएक वाट
तुझ्या नी माझ्या सुखदुःखाची।।
एक ते आता सारे संकट
तुझ्या वाटेत येऊन पाही
माझे गाणे तुझा ग कंठ
एकमुखाने गाऊ पाही।।
तू हासलीस हसलो मीच
तू रडलीस रडलो मीच
दूर तू जाता माझा अंतच
खऱ्या प्रीतीची ओळख हीच।।
