STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

4  

Sushama Gangulwar

Romance

काळजातील मैत्री

काळजातील मैत्री

1 min
183

तू येता जीवनात माझ्या 

माझ्या जगण्याचे अर्थ बदलले 

काळजातील मैत्री म्हणजे काय? 

तुझ्या सहवासात ते मला कळाले


आयुष्यातील कित्येक दिवस 

असेच निघून गेले 

माझ्या आतील कलेला सखी 

माझ्यापेक्षा जास्त तूच जाणले


तुझ्या हासण्यातून 

माझ्या जीवनाचे हास्य उमलले 

माझ्या काव्यातून 

आपल्या कॉलजातील मैत्रीला

शब्दाचे नवे रुप मिळाले


तुझ्यासवे स्वप्नांची 

घेते मी गगनभरारी 

तुझी माझी दोस्ती देते 

प्रत्येकाला उत्तर करारी


तू आहेस सोबत माझ्या 

कुणाची हिंमत नाही मला हरवायची 

फ़क्त तुलाच हक्क दिले मी 

घासातील घास मला भरवायची


तुझा क्षणाचाही दुरावा 

सहन होत नाही मला 

माझ्या काळजाची वाढणारी स्पंदने 

बघ आहे आपल्या मैत्रीला पुरावा


तुझ्या डोळ्यात दिसते 

आपल्या नितळ मैत्रीची भावना 

सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणात 

तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी 

हीच काळजातील मैत्री आहे ना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance