धागा रेशीम बंधाचा
धागा रेशीम बंधाचा
भावाच्या रक्षणासाठी बांधे
बहीण धागा रेशीमबंधाचा
रक्षाबंधन हा खास सण
बहीण भावाच्या नात्याचा.......
अनमोल असे पवित्र नाते
प्रेम जिव्हाळा व आपुलकीचा
लहानपणापासूनच खास असा
ऋणानूबंध जुळे बहीण भावाचा.......
रुसवे फुगवे नि भांडणे झाले जरी
पुन्हा ते आपुलकीने एक होई
खेळणी खाऊ असो काहीही ते
दोघे मिळून नक्कीच वाटून घेई.......
सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणात
भाऊ करी बहिणीचे रक्षण
भाववरील संकट टळावे म्हणून
बहीण करी मायेने अक्षवन........
बहीण भावाच्या नात्यामधला
राखी एक अनमोल धागा
बहीण सासरी गेली तरी तिच्या हृदयात
भावासाठी राही कायमची जागा........
बहीण आणि भावांमध्ये असे
एक प्रेमळ असा अतूट बंध
एकमेकांपासून लांब असतील जरी
दरवळ देई या नात्यातील गंध.......