परके धन
परके धन
कशी फेडेल जन्मदात्या
माता-पित्याचे ती ऋण
म्हणतात मुलगी म्हणे
असते परक्याचे धन...
किती दिवस सरले तरी
लागे माहेराकडेच मन
भेटे त्यासी गात राही
माहेराचे ती गुणगान...
वाट पाहते ती भाऊराया
जाशील घेण्या सणास
बाल मैत्रिणींना भेटण्याचा
उत्साह तिच्या मनास...
आई-वडिलांच्या वयाची
घोर वाटे तिच्या जीवास
हुरहुर लागे काळजाला
मनी त्यांच्या नावाचाच ध्यास...
मुलगी म्हणजे खरंच
आई-वडिलांची श्वास
सदा लागून राहते माहेरास
तिच्या येण्याची आस...
म्हातारपणी निरंतर
मुलीच्या पावलांचा भास
शेवटच्या क्षणाला हवं असतं
तिच्याच हातचा घास...
माहेरच्या आठवणीशिवाय
जात नाही तिचेही एक क्षण
मग सांगा मुलगी म्हणजे
कशी झाली परक्याचे धन...