STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

सलाम शहिदांना

सलाम शहिदांना

1 min
256

भगतसिंह,सुखदेव, राजगुरू असे 

महान क्रांतिकारक अवतरले या धरीवर 

सलाम करू अशा शहीद वीरांना 

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत चढले फासावर...


अहो रात्र देशाच्या हितासाठी लढत होते 

भूमातेचे बलाढ्य असे क्रांतिवीर 

स्वतःच्या जीवाची कधीच केली नाही परवा 

असे ही जन्माला आले होते काही कोहिनूर....


लाला लजपत रॉय यांच्या मृत्यूची बातमी  

या वीरांना अगदीच सहन नव्हती झाली 

म्हणून इंग्रज अधिकारी सँडर्स यांची 

या तीन क्रांतिवीरानी लपून हत्या केली.....


ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भगतसिंह, सुखदेव 

राजगुरू यांना बंदिस्त केले होते तुरुंगात 

फाशीची शिक्षा ठोटावल्या नंतर ही 

वीर पुत्र हसत होते एकमेकाचे धरून हात.....


फासावर जाताना ही रंग दे बसती चोला 

आणि देत होते इन्कलाब जिन्दाबाद चे नारे 

भारत मातेच्या धरतीवर जन्म घेतले होते 

महान वीर क्रांतिकारी देशाचे भक्त खरे.......


Rate this content
Log in